पाऊस आणि मी...
पाऊस आणि मी...
पाऊस आणि मी
आमचे नातेच अनोखे
खरतर..आमच पटत नाही
आणि पटलच कधी तर..
एकमेकांशिवाय करमत नाही
मला तो या आधी
कधीच आवडत नव्हता
पण, न जाणे कधी
आम्ही मित्र झालो आणि
मला तो आवडु लागला
तो त्याच्या भावना
असा अविरत बरसुन
मला सांगत असतो
आणि मी..त्या शब्दांतुन
व्यक्त करत असते
मी एकांतात असतांना
अश्रु दिसु नये म्हणुन
असा बेभान कोसळतो
हसतांना माञ सरीतुन
गालाला हलकेच स्पर्शतो
असा हा उनाड पाऊस
खुप लपंडाव खेळतो
वर्षातुन चारच महीने
मला भेटतो तरी पण
आता जीवाभावाचा वाटतो
आमचे हे अनोखे नाते
मनातुन मनाला भिडणारे
सख्या सोबतीच्या जीवाचे
अनोख्या प्रेमाच्या नात्याचे
नाव एकच...
पाऊस आणि मी