कधी कधी तु पण..
कधी कधी तु पण..
कधी कधी तु पण
माझ्यासाठी जगुन बघ,
मनाच्या गाभारी
हळूच डोकावून बघ..
एकांतात असताना
मला आठवुन बघ,
कधी कधी तु पण,
माझ्यासाठी जगुन बघ..
तुझ्या भावनांना
शब्दांत मांडुन बघ..
स्वतःला माझ्यासाठी
शब्द बनून बघ..
माझ्यासाठी तु पण
कविता करून बघ,
कधी कधी तु पण,
माझ्यासाठी जगुन बघ..
डोळे बंद असतांना
दिसेल जेव्हा समोर,
अश्रूंंच्या तुझ्या भावना
डोळ्यात साठवून बघ..
हसर्या या चेहऱ्याने
स्वतःला विसरून बघ,
कधी कधी तु पण,
माझ्यासाठी जगुन बघ..
स्वप्नात रमतांना
माझ्यात रमून बघ..
खुललेल्या कळ्यांना
मोहरतांना तु बघ..
स्पर्शात फुलाच्या
मला जाणवून बघ,
कधी कधी तु पण,
माझ्यासाठी जगुन बघ..
कळले कधी जर
अस्तित्व माझे..
एकदा मनापासून
हाक देऊन बघ..
असेल तुझ्या जवळच मी
फक्त एकदा..
मागे वळून बघ..
कधी कधी तु पण,
माझ्यासाठी जगुन बघ..
