प्रेम
प्रेम
निर्सगाच्या सानिध्यात
प्रेम असे फुलले!!
तुझ्या सहवासात सख्या
मी मनोमनी खुलले!!
हवी हवी वाटते
साथ तुझी नेहमी!!
तुझे ते मृदू बोलणे
ऐकून खुश होते मी!!
भान विसरुनी जाते
शब्द कानी पडता !!
असाच गोड रहा
जीव माझा जडता!!
असेच भेटत राहू
आपण दोघे निर्सगात!!
प्रेम आपले निर्मळ
सदैव राहील आयुष्यात!!
हिरवा गालीचा मखमली
निळे आकाश सभोवरी!!
जीव जडला तुझ्यावर
होऊन स्वार सायकलवरी!!

