प्रेम
प्रेम
प्रेम कधी का कुणाला
ठरवून करता येतं ?
प्रेम नकळत होत असतं
झाल्यावरच समजत असतं.....
कधी समजतं पण उमजत नाही
कळतं पण वळत नाही
असं हे प्रेम.......
शब्दांत सांगणं कठीण असतं......
व्याख्येत बसणं तर......
त्याहूनही अवघड असतं.......
संवेदनशील मनाला ते हळूवार जाणवतं.
प्रेम ही एक तरल....आनंददायी भावना....
जी तनमनाला सुखावते.......
मन पिसासारखे हलके होऊन हवेत तरंगते.....
तेव्हाच ते प्रेमात असल्याचे समजते....
असे हे प्रेम.... एक भावना....अदृश्य पण सृजनशील
अती तरल.....आयुष्याला सुंदर वळण देऊन....
मनाला थुईथुई नाचवणारी.....जी भाग्यवंतांनाच लाभते..
जन्मजन्मांतरीच्या पूर्वसंचिताने

