STORYMIRROR

अन्वय मुक्तेय

Romance

4  

अन्वय मुक्तेय

Romance

प्रेम

प्रेम

1 min
142

आजार मला प्रेमाचा झाला,उपचार तु प्रेमाने कर.. चांदण्यांचे अत्तर शिंपडून,आसमंत तु स्वप्नांचा कर..


मनाच्या गर्भात सारे, शब्द तु दडव डोळ्यांनी..

अन् पापण्यांचे दार लावून, भाषांतरे तु मौनाने कर ...


हळुच तुझ्या बटांना, छेड तुझ्या बोटांनी.. 

रम्य आठवांच्या सांजवेळी, शतपावली तु सोबतीने कर..


अबोल तुझ्या ओठात, रंगवून नाव माझे.. 

रंगुन रंगात प्रेमाच्या,चुंबन तु आरस्याला कर...


शरदाचे चांदणे सजले,भाळी चांदणी लाव माझी.. पूनवेच्या या शुभ्र रात्री, स्विकार माझ्या निर्व्याज प्रेमाचा कर...


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Romance