प्रेम
प्रेम
नको माघार ही सखी
केलीय जीवापाड प्रीत
नकोच अव्हेरूस मला
सांगून या जगाची रीत
अनमोल डोळ्यातुनी
मोती नकोच गं सांडू
आवर तुझ्या भावना
नको माझ्याशी भांडू
प्रेमाच्याच या खेळात
तुजला काय गं हवे
देऊ का चंद्र सूर्य तारे
की आणखी काही नवे
लाजलीय बघ चंद्रिका
प्रेम या चंद्राचे पाहुनी
उधाण येताच प्रेमाला
दिलेय सर्वस्व वाहूनी
लैला मजनूची ही प्रीती
गाजली खुप इतिहासात
आपल्या अमर प्रीतीचे
होई महाकाव्य भविष्यात

