प्रेम तुझे-माझे
प्रेम तुझे-माझे
प्रेम तुझे-माझे
भिडे आकाशास
वय पडे कमी
अंगाई गाण्यास. .1
सागर मायेत
रक्षण छायेत
पावित्र्य लाडात
सुरक्षा कवेत. . 2
संस्कार हिताचे
रीत-भात त्यात
नकोत दुरावे
शील वागण्यात. . 3
विचारांचे गान
गाऊ दोघी छान
मांगल्याचे देणे
सान मान -पान. . 4
रुसवे-फुगवे
माझ्यासवे सारे
होशी राज-राणी
नवेच सहारे. . .5
जोडशी माणसे
गोड संस्कारच
जगी नाव मोठे
आम्ही तुझ्यातच. . 6