प्रेम संधी
प्रेम संधी
हिच ती कां पहिल्या-पहिल्या प्रेमाची सुक-सुकी,
कि हा आहे तुझ्या नजरेचा दोष.
तुझ्या पहिल्या-पहिल्या प्रेमाची धुक-धुकी,
करते मला चित व उडवते माझे होष.
मग हा तुझ्या-माझ्या नजरेचा नेमका दोष,
पण आपन दोगेही आहो प्रेमरोगी निर्दोष.
तुझे चुंबकीय प्रेमतरंगे उडवते माझे होष,
तुझ्या बंद डोळ्यातील प्रेम करते मला बेहोश.
ही प्रेमाची चाहुल् करणार मला बावरा,
कोण्या जोतिषाचे भाकित कि मी होणार तुझा नवरा.
तुझे सुंदर नवरीचे रुप आहे एकदम अदभुत नजारा,
जसा मोर आनंदाने वनात पसरवितो पंखपिसारा.
तुझे स्मित सौंदर्य आहे तुझा अलोकिक अलंकार,
पन माझा प्रेमभंडार खरचं आहे अनंत व अमर.
तुझ्या आहटने प्रेमसागरत उठते उंच-उंच लहरी,
मला विश्वास झाला कि तुच ती बावरी नवरी.

