प्रेम ऋतू
प्रेम ऋतू
कधी तरीच येतो प्रेम ऋतू
प्रेम ऋतू हा प्रेम ऋतू......
हरवून हृदया, प्रीत गवसते
अन् फुलण्याची, रीत समजते
फुलूनी घे तू, झुलूनी घे तू
बहर नवा, पांघरुनी घे तू
कधी तरीच येतो प्रेम ऋतू
प्रेम ऋतू हा प्रेम ऋतू......
होतो हा वर्षाव, कधी तरी
झेलून घे या, अंगावर सरी
भिजूनी घे तू, रुजुनी घे तू
नवबीजा अंकुरुनी घे तू
कधी तरीच येतो प्रेम ऋतू
प्रेम ऋतू हा प्रेम ऋतू......
चैतन्याची लहर लहर जणू
मन मोहित करी, रोमांचित तनू
हसूनी घे तू, रुसूनी घे तू
हळव्या मनी या, वसूनी घे तू
कधी तरीच येतो प्रेम ऋतू
प्रेम ऋतू हा प्रेम ऋतू......