STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

4  

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

प्रेम नजर

प्रेम नजर

1 min
538

भर पावसात तु भिजलेली दिसली मला समोर 

झाली नजरेची भेट

तूझी मादक नजर ह्रदयात भिडली थेट 


नाक तुझे चाफ्यासारखे, म्हणतो त्याला चाफेकळी 

बंद ओठांवर तुझे हसु, उमटली गालावर खळी  


कमनीय तुझा बांधा, भासे सिंहकटी  

भेटशील का ग मला, आंब्यांच्या वनात एकटी  


जुळतील आपले सुर

बदलेल आयुष्याचा नुर 


नाजुक तुझा हात दे ग माझ्या हाती  

संसार सुखाचा करू, फुलवू जीवनज्योती  


ज्योतीच्या या प्रकाशात बघेल मी तुझे खळखळणारे हसु  

माळेल तुला जुईचा गजरा, 

लाजुन तुच म्हणशील एकांतात बसु 


बघेन मी नित्याने लाली तुझ्या गालावर 

प्रेमात मी पडलो तुझ्या

चालेन तुझ्या तालावर ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance