प्रेम म्हणजे तरी काय रे
प्रेम म्हणजे तरी काय रे
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय रे
काट्यांसंगे गुलाबाचं सजण
तू माझ्यात अन मी तुझ्यात रुजण
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय रे
सरीसंगे मातीचं दरवळण
तू माझ्यात अन मी तुझ्यात विरघळण
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय रे
नभासंगे इंद्रधनुने सप्तरंगात उमटण
तू माझ्यात अन मी तुझ्यात रंगण
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय रे
दवबिंदूसंगे पातीचं चिंब भिजणं
तू माझ्यात अन मी तुझ्यात मोहरण
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय रे
नदीसंगे सागराने एक होणं
तू माझ्यात अन मी तुझ्यात समरूप होणं