प्रेम करावे असे...!
प्रेम करावे असे...!
प्रेम करावे असे
कायमच आठवणीत राहावे जसे
मंद वाऱ्यात जसे
रुप उभरून दिसावे जसे...
प्रेम करावे असे
आठवणीत पापणे भिजवे जसे
दूर असूनही आपल्या
आभास ओल्या जाणिवेत जसे...
प्रेम करावे असे
सुखद मनाचे तरंग जसे
कोसळत्या रिमझिम धारा
किनारे अखंड भरावे जसे...
प्रेम करावे असे
क्षितिजाला वाटे वेडे पिसे
तुला जाणून घेतांना
तुझ्यात ओलंचिंब भिजावे जसे...!

