प्रेम करावे असे
प्रेम करावे असे
प्रेम करावे असे नजरेने बोलणारं नजरेने समजून घेणारं
माझ्या तुझ्यातून आपलं होणारं
नकारातून होकार जाणणारं
निःस्वार्थ तुझ्या माझ्यात एकरूप होणारं
रूसव्या फुगव्यातही चोरून बघणारं
डोळ्यातील आसू हासुत बदलवणारं
निरपेक्ष वाहणारं, सागरास जाऊन बिलगणारं
ऊन सावलीत सोबत असणारं
थोडंसं झुरणारं, स्वतःचं न उरणारं
अपूर्णातून पूर्णत्वाकडे नेणारं
प्रेम करावे असे श्वासांचे हृदयाशी घट्ट नातं जसे

