प्रेम गंध
प्रेम गंध
गंधित होतो सारा परिसर तुझ्या अस्तित्वाने
सखी गंधाली मुग्ध आसमंत तुझ्याच श्वासाने
हंसणे तुझे जणू फुलली जाई जुई अंगणी
झपुर्झा प्राजक्ताचा केशरी धवल रंग झणी
तव प्रीतीचा ये बहर प्रसन्न यौवन तनू
युगे लोटत गेली वाट पाहिली कितिक मनू
तनुगंध तुझा रानगुलाबापरि दरवळे
श्वास माझा भारलेला बेभान होऊनिया चळे

