STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

4  

Abasaheb Mhaske

Romance

प्रेम एक जिज्ञासा

प्रेम एक जिज्ञासा

1 min
434


प्रेम एक जिज्ञासा

प्रेम एक आशा

प्रेम एक परीभाषा

प्रेम अभिलाषा निरंतर


प्रेम असे जगण्याची कला

प्रेम एक मायावी बला

प्रेम म्हणजे ध्यास

प्रेम एक आपुलीच घास


प्रेम असे दैवी देणगी

प्रेम म्हणजे भैरवी

प्रेम ठरते पाप कधी

करू पाहता अवाजवी


प्रेम एक विकार

तर कधी ठरते भार 

प्रेम असे निर्विकार

प्रेम एक संस्कार


प्रेम एक संवेदना ...

प्रेम सहज सुलभ भावना

प्रेम एक संकल्पना ...

प्रेम ठस ठसती वेदना


प्रेम जाणते पशु पक्षी

प्रेम सर्वांगसुंदर साक्षेपी

प्रेम चित्तारते सुमधुर लेखणी ...

प्रेम उलगडते चित्रफिती


प्रेम एक अवघड गुंता

अडीच अक्षरी शब्द हा

प्रेम म्हणजे मिलन

प्रेम म्हणजे सहजीवन


परम प्रतापी प्रेम असे

निष्फळ कधी ते भासे

प्रेम म्हणजे वात्सल्य

प्रेम असे अनाकलनीय


प्रेम हे चिरकाल टिकतं

अधिकाधिक वृद्धिंगत होत

प्रेम नाती गुंफत जातं ...

राग , द्वेषाना काबूत ठेवत


प्रेम इतरांना जवळ करत

एका धाग्यात बांधून ठेवत

प्रेम असते असाध्य कला

प्रेमाने जग ही जिंकता येत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance