प्रेम असते एक ...
प्रेम असते एक ...
प्रेम असते एक
नाजूक भावना ...
का समजून घेत नाही
कुणी त्या संवेदना ...
प्रेम उमलते अलगद
ते असते सात्विक ...
आकर्षणाचं मोहोळ जणू
दोन मनाची जवळीक.. .
ते काय ठरवून होते ?
कळत नकळत होऊन जाते
पानाफुलागत ते बहरते असते
कुटुंब वत्सलही प्रेमच असते
इतिहास साक्षी ...
प्रेमीयुगुल सदैव अभागी.
ईश्वरास प्रेम आवडते
जगास मग हे का खटकते ?
प्रेम द्यावे - प्रेम घ्यावे ठरलेले
चिरकाल सत्य असतानाही ...
का मग छळते जग हे त्यांना
प्रेमीयुगलांना का मग हि भिक्षांदेही ?

