प्रेम असावं...
प्रेम असावं...
गवताच्या इवल्याशा पानावर
साठवलेल्या दवबिंदूसारखं
नाजूक भावना एकमेकांच्या
अलगदपणे सावरणारं
सार सार सांगणाऱ्या उमलत्या कळीसारखं
वारा संगे गाणे गात झुलणाऱ्या पानांसारखं
वादळाच्या तावडीतून किनाऱ्यावर
परतणाऱ्या नावेसारखं
क्षितिजावरील इंद्रधनुसारखं
रंगाची उधळण करणारं
सुख दुखाचे रंग सारे आयुष्यात भरणारं
अनुबंधातून फुलणारं
अन् मायेतून रुजणार
आपुलकीने रुसणारं जिव्हाळ्याने हसणार
श्रावणाच्या सरी सारखं बरसणारं
तळहाताच्या फोडा प्रमाणे
हळूवारपणे नातं जपणार
मनाच्या गाभाऱ्यात देवाच्या मूर्ती सारखं
पवित्रपणा पुजणारं
परिस्थिती कुठली असो सदैव साथ देणारं
पाठीशी खंबीरपणे उभ राहणार
चांगल्या कार्याला नेहमीच पाठिंबा
आणि प्रोत्साहन देणार
स्वार्थ, अहंकार, गर्व, गैरसमज या
सगळ्यापासून जरा दूरच राहणार
फुलाच्या सुगंधा प्रमाणे सर्वत्र दरवळणार
कधी थोडं दुःख तर कथी थोडं सुख समर्थपणे पेलणार
कधी कोवळ ऊन तर कधी
थंडगार सावली बनून
प्रत्येक क्षणी आनंदाची सरींनी
ओठांवरती अलगद हसू आणणारं.....
प्रेम असावं....
............
जीवन हे धावणाऱ्या एका मृगजळाप्रमाणे,
प्रत्येकाचं अगदी अनमोल, त्यामध्ये प्रेमाचा बहर हा असलाच पाहिजे..
स्वतःवर व जगण्यावरही थोडं का होईना प्रेम करता आल पाहिजे
फक्त प्रियकर व प्रेयसी...एवढीच प्रेमाची व्याख्या नाही
आई-वडिलांचं, बहीण-भावाचं,
आप्त जणांचं, मित्र मैत्रिणीचं,
नवरा बायको मधील पवित्र अश्या बंधनातील प्रेम.....
सकल प्राणीमात्रांवर सद्भावना अन् प्रेम...
खरंच जर का असेल ना, तर प्रेमाचे चार शब्द,
स्नेहाचा स्पर्श, आपुलकीची नजर तर कधी कौतुकाची थाप,
खळखळतं हास्य आणि मदतीचा हात
या छोट्या-छोट्या गोष्टी
पण आपल्याबरोबर इतरांचाही
आयुष्य बदलून टाकतील हमखास
प्रेम असावं...असं काहीतरी खास..
प्रेम म्हणजे आयुष्याच्या वेलीवर फुललेला एक सुंदर साज, मिळतो आपल्याला विविध रूपात...
त्याला कसं जपायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आज...

