'प्रेम' आणि 'मैत्री'
'प्रेम' आणि 'मैत्री'


जेव्हापासून ती मला समजायला लागली,
तेव्हापासून मला त्यांची जवळीकता समजली,
तो माझ्यात फक्त उरला होता,
पण तिच्या मैत्रीत मात्र गुंतून गेला होता...
प्रेमापेक्षा मैत्री जास्त जवळची वाटते,
असे असूनही त्याला माझ्याशिवाय करमत नव्हते,
त्याला माझी कोणतीच गोष्ट पटत नव्हती,
पण तिची प्रत्येक गोष्ट त्याला जवळची वाटत होती...
माझ्याशी बोलत असताना तो तिच्या गोष्टी करायचा,
मैत्री त्यांची काय आहे हे सारखं मला सांगायचा,
प्रयत्न केले पण त्याच्या जवळची कधीच होऊ शकले नाही मी,
काहीच न करता मात्र त्याच्या सगळ्यात जवळची होती ती...