STORYMIRROR

Sandeep Kulkarni

Drama Inspirational

3  

Sandeep Kulkarni

Drama Inspirational

प्रभु श्रीरामचंद्र की जय

प्रभु श्रीरामचंद्र की जय

1 min
2

हे रघुनंदन, हे श्रीराम

करतो वंदन, तुम्हा प्रणाम

तुम्हाविन या जन्मा

ना अर्थ, ना, काही राम

हे रघुनंदन, हे श्रीराम

करतो वंदन, तुम्हा प्रणाम...


सत्याचे रक्षक तुम्ही, धर्माचे राजे,

सीतामाईस रक्षुनी, अयोध्यापती विराजे,

टाळ सनई चौघडे, आनंदाने वाजे,

अंतरक्षी हा एकच सुर निनादे,

रघुपती राघव राजाराम,

हे रघुनंदन, हे श्रीराम

करतो वंदन, तुम्हा प्रणाम...


सीतामाई लक्ष्मण अन् मारुती

वानरसेना घेऊन सोबती

राजत्याग केला अन् वनवास भोगती,

लक्ष्य केले त्या दुष्ट दुराचारी लंकापती

वध केला त्या दशाननाचा अन्

दिली तिन्ही लोकांसी मुक्ती

घडविले रामायण सुंदर

केला उद्धार तुम्ही, मनुष्य जन्माचा तमाम

हे रघुनंदन, हे श्रीराम

करतो वंदन, तुम्हा प्रणाम...

तुम्हाविन या जन्मा

ना अर्थ, ना, काही राम

हे रघुनंदन हे श्रीराम..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama