STORYMIRROR

Sandeep Kulkarni

Romance Fantasy Inspirational

3  

Sandeep Kulkarni

Romance Fantasy Inspirational

कल्पनांच्या सांगाती

कल्पनांच्या सांगाती

1 min
12

मनातील भाव डोळ्यांत 

उमटतात स्वप्न होउनी...

पल्लवित होती नवआशा

बंद नयनांतुनी,


जाती शब्दतरंग हळूवार,

या भावनांना स्पर्शून 

या काळजाच्या आरपार,

घुसती कट्यार होऊन, 


ना कळे कसे भासते..

भावनांचे आंदोलन

गोड गुपित अन् कधी स्मित

कसले हे बंधन...


ह्रदयी स्थिरावूनी...

भाव भावनांचे शब्दतरंग,

उमटली अलगद अधरावरूनी

आल्हाद काव्य तरंग...


अवतरून या स्वप्नांतून,

मन घेते भरारी ह्या,

अनुभवन्यास तो आनंदगिरी

बेचैन होई काया


स्वप्नांच्या हिंदोळ्यावर.... 

येते गगनचुंबूनी

तारका अन् सप्तर्षींची

सैर होईल या मनी


होतो अधीर शशी 

भेटावयास सागर लाटांशी,

भरती नसतेच आता

नशीबी फक्त ओहोटी,


अनावर भावना उसळती

अधांतरी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरती....

हे जीवन असेच सुंदर

उरल्या कल्पनांच्या सांगाती....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance