STORYMIRROR

Sandeep Kulkarni

Others Children

3  

Sandeep Kulkarni

Others Children

पाठवणी

पाठवणी

1 min
3

नयनी आले भरूनी पाणी

बाळे तुझी सांग कशी गं मी करू आज पाठवणी,

नयनी आले भरुनी पाणी...


तुझ्या लडिवाळे भरले अंगण

छुण् छुण् करिती नाद पैंजण 

 कशी ऐकु मी तुझी गुणगुण

 तुझी किलबिल वाणी...

बाळे तुझी सांग कशी गं मी करू आज पाठवणी,

नयनी आले भरुनी पाणी...


अल्लड अवखळ तुझे हसणे,

आम्हा मायबापा चे तेच जीवनगाणे

 वटवृक्षाची गळती पाने

 उरती फक्त आठवणी....

बाळे तुझी सांग कशी गं मी करू आज पाठवणी,

नयनी आले भरुनी पाणी...


बघ जन्माचा डाव असा हा,

सदैव खुशाल अन् सुखी तू रहा

  चैतन्याचा शुभसोहळा हे

  ऊर आले थोडे गहिवरूनी,

बाळे तुझी सांग कशी गं मी करू आज पाठवणी,

नयनी आले भरुनी पाणी...

बाळे तुझी सांग कशी गं मी करू आज पाठवणी,

नयनी आले भरुनी पाणी...


Rate this content
Log in