STORYMIRROR

Sandeep Kulkarni

Tragedy Inspirational Children

4  

Sandeep Kulkarni

Tragedy Inspirational Children

वाट पाहते आहे आपली शाळा

वाट पाहते आहे आपली शाळा

1 min
6

घंटा वाजली टण् टण् टण् टण् 

करा रे पोरांनो वह्या पुस्तकं गोळा,

घ्या डबे,भरा आपली आपली दप्तरं , 

सुटली आहे आजची शाळा... 


न चुकता गणितं मनाने सोडवा आणि शुद्धलेखनाची शिस्त पोरांनो जरा तरी पाळा,

लिहून घेतलाय का आजचा गृहपाठ, 

मला पुसून घ्यायचा आहे फळा..

बिगीबिगी आवरा पोरांनो,

अरे सुटली की रे शाळा 

पळू नका रांगेत चाला, पायऱ्या वरुन नीट उतरा , 

अरे ऐक की रे ए राजा, अरे ए बाळा,

नीट घरी निघा वाटेत खात बसू नका पेरू चिंचा आणि आवळा..


सावकाश घरी जा पोरांनो,

अभ्यास करा, खूप मोठ्ठे व्हा,

कितीही कठोर वागत असलो तरी लागतो आम्हाला तुमचा लळा,

कितीही लांब उडून गेलात पाखरांनो, तरी लक्षात ठेवा

रोज तुमची वाट पाहते ही तुमची शाळा,


रोज वाट पाहते ही तुमची शाळा ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy