STORYMIRROR

Sandeep Kulkarni

Abstract Others

3  

Sandeep Kulkarni

Abstract Others

आयुष्याच्या वळणावरती

आयुष्याच्या वळणावरती

1 min
7

आयुष्याच्या वळणावरती,

भेटली कैक सखे सोबती,

काही ओळखीची तर काही

अनभिज्ञ होऊन येती,

प्रारब्धाचा खेळ म्हणे,

रक्ताची नसली तरीही

जिव्हाळ्याची असती,


आयुष्याच्या वळणावरती,

भेटली कैक सखे सोबती


काही स्वार्थासाठी

 तर काही गरजेपुरती 

बिकट प्रसंगी धावुन येती

तीच खरी नाती,

आयुष्याच्या वळणावरती

भेटली कैक सखे सोबती!


एकटाच आला धरती,

एकटाच विरला पंचभूती,

ओळखीची असो वा 

अनोळखी ची,

जन पळभर हाय हाय म्हणती,

राहतील फक्त आठवणी,

या जगी न काही उरती,

आयुष्याच्या वळणावरती

भेटली कैक सखे सोबती....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract