STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Children

पोवाडा-निसर्गाचा

पोवाडा-निसर्गाचा

1 min
215

शिकून तुम्ही अज्ञानासारखी 

सुशिक्षित लोकांनो वागू नका 

डोंगर,फोडून माड्या बांधतात 

तो महाल कशाला तुम्हां सांगा जी जी र जी 


सगळीकडे महामारी आली 

लोक जीवघेणी आजारात मेली 

जंगले तोडून महाल बांधतात 

हा श्रीमंतीचा थाट कशापाई जी जी र जी 


तंत्रज्ञानात प्रगती केली 

संगणकात शहाणी झाली 

पर्यावरण अभ्यास शिकली 

शिकून अडाणी तशीच राहिली जी जी र जी 


माणूस म्हणून कसे वागावे 

निसर्गाकडून शिकून घ्यावे 

त्यांच्यासाठी नव्हते विद्यापीठ 

अनुभवातून शिक्षण घ्यावे जी जी र जी 


 सत्ता आली,पैसा आला 

 निसर्गावर हल्ला करू नका 

 गर्व हरण एक दिवस होईल 

 निसर्गाला मग दोष देऊ नका जी जी र जी 


उगाच का रे त्यांना छळता 

परोपकारी त्यांचे जीवन 

निसर्ग आपला जीवनदाता 

नका ओढवू आपले मरण जी जी र जी 


कुणीच नाही इथे मालक 

उगाच आपले म्हणू नका 

एक दिवस जायचे आहे 

हे कधीच विसरू नका जी जी र जी 


प्रगतीच्या गोंडस नावाखाली 

नैसर्गिक संपत्ती संपवू नका 

सुंदर,निरोगी जीवनाचा 

मानवा घात आता रे करू नका जी जी र जी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children