STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

पोटासाठी

पोटासाठी

1 min
222

खेळे जुगार पोशिंदा

भूक शमविण्यासाठी .

रोज कष्ट त्याच्या माथी

दिनरात पोटासाठी.


घाम गाळतो उन्हात.

नसे पायात चप्पल.

नित्य शेणपूंजा करी

माथी पडल टक्कल.


ज्याची त्याची धावपळ

 रोज असे पोटासाठी.

फिरे माय अनवाणी

बाळ बांधुनिया पाठी.


माय तान्हुल्या सोडून

जाते रोज कामासाठी.

होतो जीव खालीवर

गत नाही पोटासाठी.


भर उन्हात राबतो

कामगार पोटासाठी.

सैनिकही सीमेवर

एकटाच देशासाठी.


 खेळ करी डोंबारीही

भटकतो दिशा दाही.

भीक मागतो एखादा

पोटासाठी सारे काही .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational