STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

2  

Dilip Yashwant Jane

Tragedy

पोरके

पोरके

1 min
362

भेट अजून स्मरते

ओढ्याकाठी घेतलेली

स्वप्नी आकंठ रंगून

जीवापाड जपलेली


क्षण सौख्याचे ते सारे

हृदयी जपून ठेवले

घात काळानेच केला

हिरावून तूज नेले


वेलीवर संसाराच्या

उमलली फुले छान

कशी ओंजळीत माझ्या

गेली टाकून तू दान


कशी काढावी समज

लेकरांची त्या लहान

आईविना ते पोरके

कसे करू संगोपन


कसा झाला देवा तू ही

आज इतका निष्ठूर

वार नियतीचा कसा

झेलू माझ्या अंगावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy