पंख
पंख
मला पंख असते तर ??? ही कल्पनाच किती सुखावह आहे .
मला पंख असते तर , मी सुंदर पक्षी असते तर,
आकाशात उंच भरारी घेता आली असती ,
थव्यांमध्ये सामील होवून आकाशात विहरता आले असते,,
नवनवीन आकृत्या करून त्यात संथ वाहत जाता आले असते ,
न कुणाची भिती न कुणाची काळजी ,
मुक्त आणि मोकळे जीवन जगता आले असते ,
माणसांसारखी न दगदग न धडपड ,
नाही स्पर्धा किंवा चढाओढ , नाही कुणाशी बरोबरी ,
मिळेल ते अन्न खावून , मिळेल तिथे पाणी पिऊम ,
घनदाट झाडाच्या फांद्यांवर विसावा घेवून ,
पुन्हा त्या विशाल आकाशात , थंड हवेत उडायचे ,
हाच तर रोजचा उपक्रम ,
सायंकाळी सुर्यास्ता पूर्वी पुन्हा थव्यात मनसोक्त विहार करून ,
थकल्यावर विसावा घेऊन पुन्हा एकदा नवीन दिवसाची
चाहूल लागताच साथीदारांना साद देवून एकत्र आणणे,
उंच उडून , सुरक्षित ठिकाण , खानपान याचा शोध घेणे ,
सुंदर मनोहारी निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे ,
रंगीबेरंगी फुले , पाने , फळं , नदी तलाव व सर्वत्र पसरलेली हिरवळ ,
जंगल , पशुपक्षी , फुलपाखरं सर्वच किती सुखावह
त्यात एका सुंदर इमानदार जोडीदाराची सोबत ,
गवताच्या काड्या एकत्र करून विणलेले ते उबदार घरटे ,
त्यातच पिल्ल आणि असं ते कुटुंब ,
खरंच किती सुखावह असते पक्षांचे जीवन !
मला पण पंख असते तर , मी पक्षी असते तर !
