STORYMIRROR

Sant Namdev

Classics

2  

Sant Namdev

Classics

पक्षिणी प्रभातीं चारियासी

पक्षिणी प्रभातीं चारियासी

1 min
14K



पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये ।

पिलूं वाट पाहे उपवासी ॥१॥


तैसें माझें मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतीतसे ॥२॥


तान्हें वत्‍स घरीं बांधलेंसे देवा ।

तया हृदयीं धांवा माउलीचा ॥३॥


नामा म्हणे देवा तूं माझा सोईरा ।

झणीं मज न अव्हेरा अनाथनाथा ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics