STORYMIRROR

Dinesh Kamble

Romance

3  

Dinesh Kamble

Romance

पियू

पियू

1 min
325

सांग ना पियू?

तू कोणत्या मातीची बनलेली गं? 

कसं? कसं जमतंय तुला? 

माझा राग प्यायला


मी तापट, रागीट, शीघ्रकोपिष्ट

तरीही सामावून घेते मला तू 

तुझ्या क्षमाशील, प्रेमळ हृदयात आणि 

चिंब ओला करतेस मला 

त्या प्रेमाच्या नित्याने कोसळणाऱ्या पावसात...


स्वभाव बदलत आहे माझा 

जाणीव माझीच मला होते आजकाल 

पण,'तू बदलला रे' हे साधं वाक्यसुद्धा 

येऊ नये तुझ्याकडून...


खरंच पियू...

तुझी तर कमालच वाटते गं...

किती विशाल मनाची तू? 

माझ्या कित्तीतरी वाईट 

गोष्टींना सहजच 

दुर्लक्षित करते

पण मला मात्र 

मनाच्या कोपऱ्यात  

नित्य जपते...


मी जेव्हा आत्मपरीक्षण करतो ना 

तेव्हा तू विस्तीर्ण जाणवते मला 

जगातल्या सर्वात विस्तीर्ण

सागराहूनसुद्धा विस्तीर्ण..


मी मात्र खुजा खुजा एखाद्या 

बांधावरील बुजगावण्यागत...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance