STORYMIRROR

Pratibha Vibhute

Romance

4  

Pratibha Vibhute

Romance

फुलले रे क्षण माझे

फुलले रे क्षण माझे

1 min
552

सोनसळीची उधळण 

करीत गुलाबी पहाट

टपोरे जलबिंदू पसरे

धुक्यात दिसेनाच वाट...१!


सृष्टीत बहरले नवचैतन्य

चराचरात झाला आनंद

फुलले रे क्षण माझे आज

सख्या कुशीत रे परमानंद...२!


अलवार स्पर्श होताच 

तन, मन माझे मोहरले

तुझ्या सवे माझे जीवन

रातराणी सम बहरले...३!


ऋणानुबंध जुळले छान

जीवनी फुलले क्षण माझे

आणखी काय हवे संसारी

कौतुकाने आयुष्य रे गाजे...४!


काही मागणे नाही माझे

फक्त तुझा हाती हवा हात

येऊ दे किती ही संकटे

करू त्यावर समर्थपणे मात...!५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance