फुले वसंत प्रेमाचा
फुले वसंत प्रेमाचा
न्हाले रें तव प्रीतीतच
सख्या मोहरलेय मन
फुले वसंत प्रेमाचा हा
शहारलेय माझेच तन
सौख्याला उधाण येता
वृक्षांना फुटली पालवी
तुझ्या धुंद सहवासातच
दिनरात खुशीत घालवी
कसे सांगू सख्या तुला
मोहर आम्रसरींना आला
कोकिळेच्या मधुर कुजने
आम्रवृक्ष सुगंधात न्हाला
गुलमोहर बकुळी फुलले
मोगर्याचा दरवळ सुटला
तू साद मज देताच सख्या
श्वास ऊरांतच बघ दाटला
आठवांच्या सांजवेळेस
वाटे असावा तव सहवास
हात हातात असावा तुझा
मिठीत घेऊन बसावे खास

