STORYMIRROR

Vijay Sanap

Fantasy

3  

Vijay Sanap

Fantasy

फुले निसर्ग किमया

फुले निसर्ग किमया

1 min
4.7K


केली तोडून भकास

वन राईची रे छाया

घाव घालून बुडाशी

केली सपाट किमया ।।


नसे ओलावा कोठे ही

सोसे ऊन्हाची रे झळ

फुले निसर्ग किमया

मग होते पानगळ ।।


तरु उभा माळावर

तापे ग्रीष्मातला रवी

ऋतू वसंत येताच

त्याला फुटते पालवी ।।


येता पावसाच्या सरी

माता धरा दरवळे

फुले निसर्ग किमया

गंध फुलाचा उधळे ।।


वारा घालतो रे पिंगा

रोज पानाच्या भोवती

वट वृक्ष वेली सारे

जोडी निसर्गाशी नाती ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy