STORYMIRROR

Pradnya Ghodke

Inspirational

3  

Pradnya Ghodke

Inspirational

फुले लाजुनी गाती...!

फुले लाजुनी गाती...!

1 min
276

मज स्वप्न काय नवे,

असे पडावे पहाटेत..

कधी बोले कोड्यात,

कधी उखाणे तिढ्यात...! १.


स्वर... मधुर कोवळा,

अन् अंगावरी शहारे..!

जणू किनार बोले,

बोल वाहतात वारे...! २.


येथे हरेक... मेघ,

आला पाहा भरूनी...

रानात जणू फुले,

फुलांचे मोर पिसारूनी...! ३.


दूर त्या नभाशी, 

हे संवाद पर्ण-संभारे...

कोसळत्या धारांचे ते, 

सूर किती साजरे...! ४.


तरारूनी कोंब जेव्हा,

उन्हांत ते न्हाती...

परागांची गाणी तेव्हा,

फुले ती लाजूनी गाती...! ५.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational