STORYMIRROR

Kishor Zote

Romance

3  

Kishor Zote

Romance

फुलाचे पैंजण (सहाक्षरी)

फुलाचे पैंजण (सहाक्षरी)

1 min
12K

निळीशार साडी

काठापदराची

कत्था रंग जर 

भासे ती सोन्याची


ती नेलपॉलिश 

पायाच्या नखांना 

गर्दच गुलाबी 

जरा ती बघाना


जोडवे आणावे 

आता कोणी तरी !

वाट ती पाहते 

बसूनिया दारी


गोऱ्या घोट्यावर 

फुलाचे पैंजण

ऐकुन हसते 

त्याचेच गुंजन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance