फक्त तुझ्याच भरोश्यावर...
फक्त तुझ्याच भरोश्यावर...
#फक्त तुझ्याच भरोश्यावर......
हातात हात घेतलास तर,
अर्ध्यावर सोडू नकोस.
फक्त तुझ्या भरोश्यावर मी माझं।
सर्वस्व तुला अर्पण करेल.
फक्त तुझ्या भरोश्यावर घरच्यांना परक करून,
परक्यांना आपलं म्हणेल.
फक्त तुझ्या भरोश्यावर मी।
मी मरणालाही जाईल सामोरी.
फक्त तुझ्या भरोश्यावर,
केलंय हे प्रेम.
फक्त तुझ्या भरोश्यावर,
जोडलंय हे नातं.
फक्त तुझ्या भरोश्यावर,
उचललंय हे पाऊल.
फक्त आणि फक्त तुझ्याच भरोश्यावर.......

