फक्त तुझ्या येण्याने
फक्त तुझ्या येण्याने
सारं मिळेल सारं पळेल, अगदी सारं बहरलेही.
सगळा आनंद, फक्त तुझ्या येण्याने.
थोडीशी भिती कायम, स्वप्न रंगवतो छान.
शेतकऱ्यांच सुखं घेईल, पिकेल घराचं रान.
भूक ही विसरेल, तहान ही भागणार नाही पाण्याने.
सगळा आनंद, फक्त तुझ्या येण्याने.
काय करू नी काय नाई, सुचत नाही काई.
वाट पाहून पाहून, आता खुप झाली घाई.
सूर ऐकायचे आता, तुझ्याच त्यां रड्ण्याणे.
सगळा आनंद, फक्त तुझ्या येण्याने.
काय बोलू बाळा, आकाश ठेंगणें झाले.
सगळी संकटे ती, अशी पळून गेले.
सुरू होईल घाई तुला ओरडन्याची, खोटं खोटं रागावन्याने.
सगळा आनंद, फक्त तुझ्या येण्याने.
झालो कितीही अशांत, किंवा कितीही हताश.
आयुष्यात झाला सुखाचा या, जरी असा हा विनाश.
संपलो होतो सगळा, सगळं काही ते जाण्याने.
मिळाला पुन्हा सगळा आनंद, फक्त तुझ्या येण्याने.

