Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suvarna Patukale

Inspirational

4.0  

Suvarna Patukale

Inspirational

फक्त एकदाच

फक्त एकदाच

1 min
334


पहा कुणाच्या पापण्यात

एखादं स्वप्नं देऊन

फक्त एकदाच....

पहा हृदयाच्या गाभाऱ्यात

प्रीतीची ज्योत लाऊन

फक्त एकदाच.....

पहा कुणाच्या आसवांना

आपल्या ओंजळीत झेलून

फक्त एकदाच.....

पहा कुणाच्या सलणा-या

वेदनेला थोडसं गोंजारून

फक्त एकदाच.....

पहा कुणाच्या निराश मनात

थोडीशी आशा पेरून

फक्त एकदाच.....

पहा सहज एखाद्या वळणावर

पुन्हा मागे वळून

फक्त एकदाच......

आता अधोरेखित करा

आपली जमा बाजू

काहीच न मिळवून सुद्धा

ज्या क्षणांनी बरंच काही

मिळवून दिलं अशी

फक्त एकदा नाही अनेकदा.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational