पहिला पाऊस
पहिला पाऊस
पावसाच्या रिमझिम सरी
सोबत मायेचा झरा
बरसोत आठवांच्या सरी
तरी मज वाटे बरा
वाट पाही वर्षभर
मनी वसल्या भावना
निसर्ग साद घालती
दूर करती यातना
बरसे मनावर असा
जसा मोर नाचे फुलवून पिसारा
सोबती चहा भजीचा घेऊन मेळा
कसा आवरू हा सारा पसारा
मेघ गर्जनेने सुरुवात करी
हिरवाईने नटली धरणी
चढविला साज शालूचा
ओथंबली नवलाईची सजनी
बरसुनी चिंब भिजवितो
जुन्या क्षणांना देतो उजाळा
कधी महापूर कधी दुष्काळ
आठवणींच्या सोबतीचा जिव्हाळा
