Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Raikhelkar

Abstract

3  

Mahesh Raikhelkar

Abstract

पहा एकदा

पहा एकदा

1 min
367


सकाळची कोवळी किरणे

पौर्णिमेचे टिपूर चांदणे

पहा एकदा !


फुलांची नाजूक कळी

गुरांच्या चरणाऱ्या फळी

पहा एकदा !


पावसाच्या पडणाऱ्या सरी 

सांजवेळी सूर्य जाताना घरी 

पहा एकदा !


आभाळी उडणारे पक्षी 

दारातील रांगोळीची नक्षी 

पहा एकदा !


अंगणातील फुलांचा सडा 

फळांनी लगडलेल्या झाडा 

पहा एकदा !


खळखळ वाहणारी नदी 

पक्षांच्या घरट्यांच्या फांदी 

पहा एकदा !


चमचम चमकणारे काजवे 

आकाशातील तारकांचे दिवे 

पहा एकदा !


हिरवेगार झालेले डोंगर 

धुक्यानी दाटलेला परिसर 

पहा एकदा !


नभीच्या इंद्रधनुचे सप्तरंग 

विटेवरील उभा पांडुरंग 

पहा एकदा !, पहा एकदा !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract