STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

4  

Prashant Shinde

Tragedy

पेताड...!

पेताड...!

1 min
178

पेताड....!

(मनोगत....)

मी पेताड पेताड

डोळे उघडे सताड

चकणा अजून थोडा वाड

खुलुदे अंतराचे कवाड..

आहे गडी ताडमाड

जीवनी काही नाही राड

सारीपाट सारा ओसाड

खुलूदे अंतराचे कवाड...

बोलू नको फाड फाड

सगेसोयरे सारे द्वाड

म्हणती उगा पेताड

खुलूदे अंतराचे कवाड...

एक घोट रिचवला फक्त

तू होऊ नको सक्त

मन अधुरे राहिले भुक्त

खुलूदे अंतराचे कवाड...

मनसोक्त घोटेन आज

नको सांगू काही काज

उतरु दे की पुरता माज

खुलूदे अंतराचे कवाड...

संपली पुरती बाटली

दिसू लागली तू जाड

म्हण हवे तर पेताड

खुलले एकदाचे कवाड...

मी नरकाचा ग राजा

तू स्वर्गाची ग राणी

जीवनात सदा आणिबाणी

साथीस नसेना ग कोणी...

तू तुझ्या राज्यात सुखात

मी माझ्या राज्यात सुखात

बुडतो मदिरेत नखशिखांत

होऊन अस्सल पेताड

कळले सारे जीवन...

खुलता अंतराचे कवाड....!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

  prashants9606@gmail. com

  मोबाईल नं:8007740679



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy