पेरणी
पेरणी
चार खांदे विश्वासाचे
जन्म मरण रहाटी
शोध चांदणे शिंपत
चक्रव्यूह भूकेसाठी
धन सत्कर्म संपत्ती
देहसुख रातराणी
शाल कर्तृत्व निर्मळ
तेजपूंज खतपाणी
रजोगुण तमोगुण
सोड ताठा अहंकार
पुण्यदान पखरण
सत्य पेरणी संस्कार
नाभी कस्तुरी हासरी
काय थोर उपकार
ह्दय मंदिर ईश्वर
देवत्वाचा साक्षात्कार
रामायण इतिहास
धडा प्राक्तनाचा खेळ
सद्गुरु कृपावंत
मोक्षप्राप्ती बसे मेळ
