STORYMIRROR

Aruna Honagekar

Tragedy

3  

Aruna Honagekar

Tragedy

पदर

पदर

1 min
164

जन्मास आली तवा 

माय तोंड लपवून

पदराला होती रडत

तिसरी मुलगी झाली

म्हणून बापूस म्हणे

जा गेलीस उडत। 


तिन्ही मुलींना

पदराखाली घेऊनी

निघाली माय

 केला निश्चय मनातून

वाढविण्याचा हाच

उरला उपाय। 


तारुण्याच्या पदराला

कोणी बी हात लावील

या भीतीनं धरलं वटवृक्षाला। 

तिन्ही पोरींसाठी नाही 

पसरला पदर कोणा पुढे

केली मोलमजुरी शेतात

चाले संसाराचे गाडे। 


आज मुली शिकून

झाल्या अधिकारी

आईच्या पदरात किनार

 असे मानाची भरजरी। 

डोईवर पदर आईचा


शान असे बाईचा

पदरातील संवेदनाना

मोकळया करूनी

जिंकल्या वाटा तीने

आपल्या आयुष्याच्या। 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy