STORYMIRROR

Shashikant Shandile

Romance

2  

Shashikant Shandile

Romance

पावसाच्या सरी सारखं

पावसाच्या सरी सारखं

1 min
3.2K


पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं

कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं

जीवनाच्या ओठांवरती शब्द माझे असावे

प्रेम त्याच्या मनी फक्त माझ्यासाठी असावं

जसं जोडपं लैला-मजनू आणी हिर-रांझ्याचं

तसं जोडा माझ्यासंगी कुणीतरी जूडवावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं

कुणीतरी जीवन आपलं माझ्यासाठी अर्पावं

नको मला हीन भावना नको मला ते प्रेम स्वार्थी

प्रेम त्याचं जगापेक्षा गगन भेदी असावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं

कुणीतरी जीवन आपलं ममजीवनाशी मिळवावं

स्वप्नामध्ये दूर उडावं, थोडं हसावं, थोडं रडावं

कुणाच्यातरी प्रेमामध्ये रात्रीलाही जागावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं

मात्र त्याला प्रेमाचं पूर्ण ज्ञान असावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं

कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance