पावसाची ओढ
पावसाची ओढ


मी पाहिली आहे,
पावसाची ओढ तुझ्यातली,
ती पावसाची चाहूल,
तुझ्या वेड्या मनाला लागलेली...
मी पाहिलं आहे,
बरसणाऱ्या सरीत तुझं भिजणं,
त्या पावसाच्या येण्यानं,
तुझं अनामिक खुलणं...
मी पाहिलं आहे,
पावसात चिंब चिंब भिजणारी तू,
माझ्या मनाला हरवून नेणारी,
माझ्या आवडत्या श्रावणसरी परी तू...