पावसा कधी रे कळेल तुला
पावसा कधी रे कळेल तुला
तुजवरीच पावसासारी अवलंबून सृष्टीतरी का तू न ठेविशी तीजवरी कृपादृष्टी
सुधा भ्रमण करिते सदा नियमित नेमाने म्हणूनच येती जगी ऋतूचक्र ते क्रमाने
पण पावसा तूच का करी तो चुकार पणाराही आडूनी दावितो सदा तुझाची मी पणा
येता न कधी वेळेवर करितोस तू उशीरपाण्या विना ती शिवारे सदा पाण्या साठी अधीर
विना पाणी जीव सृष्टी कशी सांग बहरेल प्राणी मात्र तुजविण कसे बरे जगतील
येता न तू वेळेवर कधी अवचित येऊनी उभ्या पिकाचे करितो नुकसान तू करुनी
अती वृष्टी करुनी नेतो वाहूनी घरदार करी सर्व जना मना सर्व परीने बेजार
उभे पीक दाण्या सवे पाहूनिया मोद वाटे तुझ्या नको तेव्हा येण्याने मनी मात्र दुःखची दाटे
