STORYMIRROR

Aaditya Suryavanshi

Abstract

2  

Aaditya Suryavanshi

Abstract

पाऊस

पाऊस

1 min
14K


पाऊस पाऊस ...त्यात भिजली पहाट..

भिजल्या पावसात भिजलेली वाट..

शब्द जाहले थेंब,दारी सरींचे ओघळ...

आठवणी या मनात, गार वा-यासंगे चिंब...

थेंब थेंब साचलेले त्यात हलकेसे तरंग ..

नव्या नव्या पावसात सतरंगी पसरलेले रंग...

पाऊस पाऊस त्यात भिजली पहाट...

पाऊस पाऊस...इन्द्रधनूही भिजले..

सप्तरंगी रंगात किरणेही आज सजली..

गारवा हा हलकेच क्षितिजाला हाक देई..

सांज ही ओली रात्रीला साद देई...

पाऊस पाऊस..त्यात भिजलेली वाट...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract