गर्द सावळीतून ....
गर्द सावळीतून ....
गर्द सावलीतून उन्हे पसरावी...अलगद अलवार झेलावी किरणे सोनेरी..सोबत तुझी अनामिक ओढ..बांधून आठवणीचे उंच उंच इमले...काही सुखाचे कवडसे, अगदी आसमंत स्वैर विहरावे... काही अबोल रूसवे तुझे..मनासी घट्ट कवटाळून घ्यावे...चाहूल तुझी दबक्या पावलांनी, मधाळ लाहीरीन्सी हितगुज करताना पुन्हा तुला क्षणात आपलेसे करावे.. उन्ह सावलीचा हां खेळ..संपुणी नवी किरणे पसरू दे आज..नवी ओळख होऊ दे आज...आज …..तू…….. मी… , गर्द सावलीतून जाताना....

