पाऊस तुला भावणारा
पाऊस तुला भावणारा
पाऊस तुला भावणारा
पहिला वहिला असतो
गंध मातीचा दरवळणारा
उल्हास मनाला करतो
थेंबा थेंबात तुला स्पर्शणारा
गारवा शहारून देतो
तुला फुलविणारा वारा
भावूक हृदयाला करतो
तुला ओलाचिंब करणारा
पाऊस भरभरून पडतो
हर्ष तुझा द्विगुणित करून
मनमीत तुझा भासतो
२१/६/२०१६ १२.३७ वा