STORYMIRROR

Sanjay Gurav

Romance Classics

3  

Sanjay Gurav

Romance Classics

पाऊस ओला

पाऊस ओला

1 min
51

तुझ्या न्हालेल्या केसांतील पाऊस

प्रातःकाळी मज भिजवून गेला

साखरझोपेच्या उंबरठ्यावर पुन्हा

पापणीस सखे निजवून गेला...


आजही भासला वेगळाच पाऊस 

कट प्रीतीचा असा शिजवून गेला

स्वप्न कालचे होईल खरे राणी

आशेचे अंकुर नवे रुजवून गेला...


रोज बरसात अशी नशिबी यावी

मन बावरे अशांत तो रिझवून गेला

मिठीत तुझीया मिळे काळीज ठेवा

आग उरातली लिलया विझवून गेला..


मैफिल रोज उनाड शौकीनाची होती

पंक्तीत सज्जनांच्या आज बसवून गेला

शिंपडून जलबिंदू शिंपल्यात मोतीया

ओळी कवितेच्या आज सुचवून गेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance