STORYMIRROR

kusum chaudhary

Romance Inspirational

3  

kusum chaudhary

Romance Inspirational

पाऊस मनातला

पाऊस मनातला

1 min
204

आला श्रावण श्रावण

लागे पावसाची झडी.

नद्या नाले ओढे झरे

वाहू लागले दुथडी.


शालू नेसून हिरवा.

धरा नटली नवरी.

आसमंती इंद्रधनु

गोफ विणतो दुहेरी.


ऊन पावसाचा खेळ

येती सरीवर सरी.

लता वेलींवर फुले

डुलतात नानापरी.


फेसाळती धबधबे

रानी डोंगर कपारी.

झरा वाहे खळखळ

कुठे थांबेना सवारी.


माहेराला कानबाई

आली मास श्रावणात.

रोटपूजा भुमंडळी

 गोळा झाले गणगोत.


आला सण पुनवेचा

मन माहेरी धावते.

मागे आयुष्य भावाला

राखी बहिण बांधते.


आली गोकुळ अष्टमी

मास श्रावण पावन.

मथुरेत अवतीर्ण 

झाले कृष्ण भगवान


भूमंडळी रंगे रास

चोहीकडे हा आनंद.

गोप गोपिका मुखात

हरे कृष्ण नि गोविंद.


सारी हयात खपतो

 बैल बळीराजा घरी.

येतो सण बैलपोळा

कृतज्ञता पूजा करी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance